मध्यरात्री धडक कारवाई करणाऱ्या महिला अधिकाऱ्याचे मंत्र्यांकडून कौतुक

मुंबई
 08 Mar 2022  269

मध्य रात्री कारवाई करणाऱ्या महिला अधिकाऱ्याचे मंत्री शिंगणे यांनी केले  कौतुक 

* अवैध खाद्य पदार्थ विक्री करणाऱ्यावर महिला अधिकाऱ्यांनी  रात्री केली धडक कारवाई 

* रात्री पावणे बारा वाजता पोलीसांत दाखल केला गुन्हा 

लोकदूत वेबटीम 

मुंबई 8 मार्च 

   उल्हासनगर येथे एका ठिकाणी अवैधपणे खाद्य पदार्थ विक्रीस बंदी घातलेलीaअसतांनाही रात्री खाद्य पदार्थ विक्री करीत असल्याचे लक्षात येताच, रात्री पावणे अकरा वाजता एका महिला अधिकाऱ्यांनी धडक कारवाई करून मध्यरात्री पोलीसांत गुन्हा दाखल केला. सदर बाबत अन्न व औषध मंत्री डॉ राजेंद्र शिंगणे यांना कळताच त्यांनी सदर महिला अधिकाऱ्यांना फोन करून त्यांनी केलेल्या कारवाईचे कौतुक केले. व महिला दिनाच्या शुभेच्छाही दिल्या. 

एका गुप्त माहिती वरून सह आयुक्त कोकण,(अन्न )सुरेश देशमुख, जिला ठाणे. यांनी उल्हासनगर येथील एका खाद्य पदार्थ विक्री करणाऱ्याची तपासणी आदेश अन्न सुरक्षा अधिकारी अरुण वीरकायदे यांना दिले. सोमवार दि 7 मार्च रोजी सौ. वीरकायदे या महिला अधिकाऱ्यांनी सदर क्रिष्णा ए -1 पाणीपुरी व भेलपुरी विक्री करणाऱ्या शॉप ची तपासणी केली असता, अन्न सुरक्षा कायद्याचे उल्लंघन करून अस्वछ अशा परिस्थितीत खाद्य पदार्थ विक्री करीत असल्याचे आढळले. शिवाय अन्न व सुरक्षा परवाना नसल्याचे आढळल्याने 7 मार्च रोजी तात्काळ खाद्य पदार्थ विक्री बंद कराण्याचे लेखी आदेश दिले. 

    मात्र सादर क्रिष्णा ए -1 पाणी पुरी वाल्याने बंदीचे आदेश जुगारून संध्याकाळी पुन्हा खाद्य पदार्थ विक्रीस सुरुवात केली. याबाबत सह आयुक्त कोकण सुरेश देशमुख (अन्न) यांना कळताच त्यांनी रात्री अन्न सुरक्षा अधिकारी अरुण वीरकायदे यांना याबाबत सूचना केली. 

अस्वछ असलेल्या ठिकाणी अवैधपणे खाद्य विक्री होत असल्याने आणि जनतेचे आरोग्य धोक्यात असल्याचे पाहून महिला अन्न सुरक्षा अधिकारी अरुणा वीरकायदे यांनी तात्काळ रात्री 10.45 वाजता सदर खाद्य पदार्थ विक्री होत असलेल्या ठिकाणी धाड टाकली. आणि बंदी नोटीस देऊनही सर्रास विक्री होत असल्याचे निदर्शनास आल्याने तात्काळ विठ्ठल वाडी पोलीसांना पाचारण केले. आणि पंचनामा करून रात्री 11.45 मिनिटांनी सदर विक्रेत्या विरोधात fir नोंद केली. 

     रात्री 10.45 वाजलेले असतांनाही सदर महिला अधिकाऱ्यांनी कर्तव्य पूर्ण करण्यासाठी प्रथम प्राधान्य देते , आणि महिला म्हणून कुठेही वेळेचे भान न ठेवता जनतेच्या आरोग्यासाठी आणि अवैधपणे विक्री करणाऱ्या विक्रेत्यांवर मध्य रात्री fir दाखल केला. अशी माहिती 

अन्न व औषध प्रशासन मंत्री डॉ राजेंद्र शिंगणे यांना कळली. मंत्री राजेंद्र शिंगणे यांनी तात्काळ सदर महिला अन्न सुरक्षा अधिकारी अरुणा वीरकायदे यांना फोन करून त्यांनी केलेल्या कारवाईचे कौतुक केले. शिवाय महिला दिनाचे औचित्य साधून त्यांना शुभेच्छा दिल्या.
   मंत्री शिंगणे यांनी दाखवलेली तत्परता आणि महिला अधिकाऱ्याचे केलेले कौतुक पाहता...अन्न सुरक्षा विभागात आनंद व्यक्त होत आहे.